इयत्ता दहावीनंतरच्या पदविका (Polytechnic) अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता प्रवेश प्रक्रिया (Admission Process ) आज बुधवारपासून (30/06/2021) सुरु होत आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाकडून अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येत असतो. यावर्षी दहावीचा निकाल 'अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे' लागणार आहे आणि यावर्षीच्या जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक वेबसाईटवर पाहता येणार : ■ पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला बुधवारी (आज) सुरुवात होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी सायंकाळी ट्विट करुन जाहीर केले आहे. ■ दहावी नंतरच्या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांची शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता प्रवेश प्रक्रिया दिनांक 30 जून 2021 पासून सुरु होत आहे. ■ या प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील, उमेदवारांसाठी महत्त्वाच्य...